जळगाव – भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात दाखल झेलेले एकनाथ खडसे यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर बालेकिल्ल्याला सुरूंग लावला आहे.
एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जामनेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या तब्बल 175 पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काॅग्रेस जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैया पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत आज जामनेर विधानसभा क्षेत्रातील नेरी आणि देवपिंप्री येथील भाजपाच्या 175 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
प्रेवशे केलेले सर्व कार्यकर्ते हे भाजपचे काम करत होते. त्यातले काहीजण हे पदाधिकारी आहेत, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
दरम्यान, कालच माजी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना कुणीच भाजप सोडून गेले नसल्याचे सांगितले होते. मात्र आज त्यांच्या मतदारसंघातील तब्बल 175 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.