‘बेल’ने ‘ईपीएल’मध्ये 7 वर्ष 266 दिवसानंतर नोंदवला गोल

टोटेनहॅमचा ब्राइटोनवर 2-1 ने विजय

टोटेनहॅम : गेरेथ बेलने 73 व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर टोटेनहॅमने इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) मध्ये झालेल्या सामन्यात सोमवारी ब्राइटोनचा 2-1 ने पराभव करत विजय साकारला.

बेल हा 70 व्या मिनिटाला पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. त्याने तीन मिनिटातच गोल नोंदवला. विशेष म्हणजे गेरेथ बेल याचा आॅक्टोबर 2012 नंतर ईपीएलमध्ये हा पहिला गोल ठरला. टोटेनहॅमकडून पहिला गोल हा हैरी केन याने 13 व्या मिनिटाला पेनल्टी व्दारे गोल नोंदवला. ब्राइटोन संघाकडून एकमेव गोल हा तारिक लैंपटे याने 56 व्या मिनिटाला नोंदवला.

या विजयासह टोटेनहॅम स्पर्धेच्या गुणतालिकेत 14 अंकासह दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे, तर लिव्हरपूलचा संघ 16 अंकासह पहिल्या स्थानावर कायम आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.