नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू बायचुंग भूतिया व भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीत स्थान देण्यात आले आहे.
हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या गेलेल्या मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी क्रीडा मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले जाते.
या समितीत केंद्रीय क्रीडासचिव राधेश्याम झुलानिया, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान, टार्गेट ऑलिंपिक पोडियम योजनेचे मुख्य संचालक राजेश राजगोपालन यांच्याबरोबरच एम.सी.मेरी कोम, अंजू बॉबी जॉर्ज, कमलेश मेहता यांचाही समावेश आहे.