ग्राहकांकडून मागणी वाढली
पुणे – सरकारकडून केली जाणारी जागृती, नागरिकांमध्ये कमी झालेल्या भीतीमुळे चिकन आणि अंडीला मागणी वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 150 ते 170 टन चिकन खपत होते. ते रविवारी (दि. 7) 250 ते 250 टन विक्री झाले. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक असल्याने चिकनचे भाव गेल्या आठवड्याच्या स्थिर आहेत.
अंडीमध्ये गावरान अंडी खाण्यास पसंती मिळत आहे. त्यामुळे गावरान अंड्याच्या भावात शेकड्यामागे गेल्या आठवड्याच्या तुलनेत 30 रुपयांनी वाढ झाली असून, इंग्लिश अंड्याचे भाव स्थिर आहेत.
बर्ड फ्लूमुळे चिकन आणि अंडी खाण्याबाबत नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे चिकनची मागणी जवळपास निम्म्याने कमी झाली होती. ती पूर्वपदावर येत आहे.
अंडी : गावरान : शेकडा-750, डझन-96, नग-8 रुपये,
इंग्लिश : शेकडा-420, डझन- 60, नग- 5 रुपये