मुंबई- बॉलिवूडचा रिअल लाईफ हिरो म्हणजे, अभिनेता ‘सोनू सूद’ हा गेल्या काही महिन्यांपासून अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध भागांमध्ये अडकललेल्या पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना आपल्या मुळ गावी पोहोचवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करेपर्यंत शक्य त्या सर्व परिंनी सोनूनं सढळ ह्स्ते मदत करत आहे.
दरम्यान, अलिकडेच पुन्हा एकदा त्याने एका लहान मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केल्याचं समोर आलं आहे. गेल्या 10-11 महिन्यांपासून सोनू सातत्याने मदत करत येत आहे. एक अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता सोनू सूदकडे आपल्या लहान भावासाठी मदत मागितली होती.
Will be done.
In a week’s time he will be perfect। @IlaajIndia @SoodFoundation https://t.co/79STcrvyxP— sonu sood (@SonuSood) February 4, 2021
या व्यक्तीची समस्या समजून घेतल्यानंतर सोनूने क्षणाचाही विलंब न करता या व्यक्तीस मदत केली आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या लहान भावावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या व्यक्तीने ट्विट करत सोनूचे आभार देखील मानले आहे.
पैसे के चलते इलाज रुकने लगे तो हम सब क्या ख़ाक हिन्दुस्तानी हैं। @SoodFoundation @IlaajIndia https://t.co/uweynXTxJP
— sonu sood (@SonuSood) February 8, 2021
“सर, गेल्या तीन महिन्यांपासून पैशांअभावी आम्हाला आमच्या लहान भावावर उपचार करता येत नव्हते. पण, आता तुमच्या एका सहकार्याच्या मदतीमुळे हे उपचार करणं शक्य झालं. माझ्या भावाला पायावर उभं करण्यासाठी मनापासून खूप आभार…!” या आशयाचे ट्विट या व्यक्तीने केले आहे.