जॉन अव्राहम आणि इमरान हाश्मीचे लीड रोल असलेल्या “मुंबई सागा’ या क्राईम थ्रिलरची पहिल्या दिवसाची कमाई तब्बल 2.82 कोटी रुपये झाली आहे. करोनाच्या लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळणे स्वाभाविकच होते.
शुक्रवारच्या ओपनिंग नंतर सिनेमाला आणखी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळण्याची शक्यता आहे, असे व्यवसायिक निरीक्षकांनी म्हटले आहे. “मुंबई सागा’ला पहिल्या दिवशी जरी चांगला रिस्पॉन्स मिळाला असला तरी जान्हवी कपूरच्या “रुही’च्या तुलनेत हे बुकींग कमीच आहे.
11 मार्चला रिलीज झालेल्या “रुही’ला पहिल्या दिवशी 3.06 कोटींची कमाई मिळाली होती. 1980 आणि 1990 च्या दशकातली पार्श्वभुमे असलेल्या “मुंबई सागा’मध्ये सुनिल शेट्टी, जॅकी श्रॉफ, काजल अगरवाल, प्रतिक बब्बर आणि गुलशन ग्रोव्हर हे देखील लीड रोलमध्ये आहेत.
गॅंगवॉर, स्मगलिंग आणि क्राईम थ्रिलर असलेल्या “मुंबई सागा’चे दिग्दर्शन यापूर्वी “काबिल’, “शूटअऊट वडाळा’ आणि “कांटे’चे दिग्दर्शन करणाऱ्या संजय गुप्तानीच केले आहे.