आरा (भोजपूर) :- बिहारमध्ये भोजपूर टोलनाक्यावर तैनात असलेल्या उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याच्यावर 50 रुपये चोरल्याचा आरोप केला जात आहे.
मात्र, मृताच्या वडिलांचा दावा आहे की, नाक्यावर तैनात असलेल्या हरियाणाच्या बाऊन्सर्सनी त्यांच्या मुलाची हत्या केली. कारण तो गोंडाचे, कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांची बाजू घेत होता.
याआधी मृत तरुणाचा पुतण्या दिलीप कुमार सिंग यानेही सांगितले होते की, 4-5 दिवसांपूर्वी बलवंत आणि बाऊन्सर्समध्ये कुस्तीपटूंवरून वाद झाला होता. बलवंत यांनी मला याबद्दल सांगितले. त्या लोकांनी चोरीचा आरोप केला आणि पूर्ण नियोजनातून प्राणघातक हल्ला केला.
कर्मचारी बलवंत सिंग हा यूपीचा रहिवासी होता आणि भोजपूरमधील कुल्हाडिया टोल प्लाझा येथे काम करत होता. हा टोल प्लाझा हरियाणाच्या रणछोड इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे.
बलवंतच्या मारहाणीचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये 6-7 लोक बलवंतला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. यामध्ये टोल प्लाझावर काम करणारे काही बाऊन्सर दिसत आहेत. यादरम्यान बलवंत दयेची भीक मागताना दिसतो.