मुंबई – अभिनय क्षेत्रात करियर करणारे अनेक कलाकार व्यवसायात देखील नवं पाऊल टाकत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रार्थना बेहरेने नव्या व्यवसायाला सुरूवात केली. सोशल मीडियाद्वारे तिने चाहत्यांना ही माहिती दिली होती. प्रार्थनाने साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. ‘वी नारी’ असे या ब्रँडचे नाव आहे. प्रार्थनानंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नव्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. त्या अभिनेत्रीचे नाव मीरा जगन्नाथ (Meera Jagannath) आहे. याआधी ती बिग बॉस मराठीमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आहे.
या कंपनीद्वारे ती अनेक कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन करणार आहे. सोशल मीडियाद्वारे तिने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मीराने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘उत्कृष्ट व सुंदर गाण्यांच्या जादूचा अनुभव घ्या असं म्हणत माझ्या ‘मीरामी’ मीडिया द्वारे लवकरच उत्तम, दर्जेदार कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आत्तापर्यंत माझ्या सर्व कलाकृतींना तुम्ही जी मोलाची साथ दिलीत तिच साथ यापुढेही देत राहाल अशी आशा. तुमच्या लाडक्या मीरा जगन्नाथच्या ‘मिरामी’ला सुद्धा असंच कायम प्रेम देत रहा.’
View this post on Instagram
दरम्यान, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘ठरलं तर मग’ मालिकेत मीराने काम केले आहे. याशिवाय बिग बॉस मराठीमध्ये ही मीरा पाहायला मिळाली होती. या शोमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.