#Bigg Boss Marathi 3 : “मी एकटी जरी असले ना तरी भरपूर आहे…’ – स्नेहा

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जय आणि स्नेहा बरीच मज्जा मस्ती करतात, खेळाबद्दल देखील बोलतात, घरामध्ये कोण कसं वागत आहे त्याबद्दल देखील त्यांची चर्चा होतंच असते. आज देखील जय स्नेहाला सोनाली बद्दल काहीतरी सांगताना दिसणार आहे.

जय स्नेहाला म्हणाला सोनाली जरी विरुध्द टीममध्ये असली तरीदेखील मी सोनालीला कधीच सांगत नाही की विशालसोबत नाही माझ्यासोबत खेळ. तिने आजही मला सांगाव. 

मी तिला फक्त एकचं सांगतो की सोनाली तू दिसतं नाहीये, मागे आहेस मग ते गृपमध्ये असो वा गेममध्ये असो. स्वत:वरती विश्वास पाहिजे. कोई रहे ना रहे साथ…हम खंबीर है असं पाहिजे.

म्हणून मी डॉक्टरला (उत्कर्षला) म्हणतो आपण दोघे जरी असलो ना तरी आपण भरपूर आहे. विचार नका करू चारजणचं पाहिजे.. स्नेहा म्हणाली “तसाच मी देखील विचार करते, मी एकटी जरी असले ना तरी भरपूर आहे.

त्यावर जय म्हणाला मलादेखील काऊंट करत जा तुझ्यासोबत. मला टीममध्ये घेशील तुझ्या, अशी का करतेस नकोय का तुला मी तुझ्या टीममध्ये…” स्नेहा म्हणाली माझी टीमचं नाहीये…. जय म्हणाला आपण टीम बनून जाऊ.” असं तो म्हणाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.