शिमला – यावेळी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. येथे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आतापर्यंत जे ट्रेंड आणि निकाल समोर आले आहेत त्यात जयराम यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची अवस्था वाईट आहे. सहा मंत्री अजूनही त्यांच्याच जागेवर पिछाडीवर आहेत तर तीन मंत्री पराभूत झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे सेराज मतदारसंघातून आघाडीवर आहेत. लाहौल स्पितीमध्ये काँग्रेसचे रवी ठाकूर यांनी तंत्रशिक्षण मंत्री रामलाल मार्कंडा यांचा पराभव केला आहे. मंत्री सुरेश भारद्वाज यांचाही पराभव झाला आहे. जयराम मंत्रिमंडळात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय सांभाळणाऱ्या सरवीन यांचा या निवडणुकीत पराभव झाला. उद्योगमंत्री विक्रम सिंह हे आधी आघाडीवर होते पण आता तेही त्यांच्या जागेवरून पिछाडीवर आहेत.
यावेळी विधानसभा निवडणुकीत राज्यातील 68 जागांसाठी एकूण 412 उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांमध्ये जयराम मंत्रिमंडळातील 11 मंत्र्यांनी निवडणूक लढवली होती. हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती विधानसभा जागेवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे तगडे नेते आणि कॅबिनेट मंत्री रामलाल मार्कंडा येथून निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांचा काँग्रेस उमेदवार रवी ठाकूर यांनी पराभव केला आहे. रामलाल मार्कंडा यांच्याकडे तंत्रशिक्षण मंत्रालयाची जबाबदारी आहे.
जयराम ठाकुर, मुख्यमंत्री –
सेराज मतदारसंघातून राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसच्या चेतरामसमोर मुख्यमंत्र्यांनी जास्त मते मिळवली आहेत. 2012 पासून जयराम सेराज या जागेवरूनच निवडणूक लढवत आहेत.
गोविंद सिंग –
गोविंदसिंग हे जयराम मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालय आहे. यावेळी ते मनाली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. गोविंद सिंग हे माजी मंत्री ठाकूर कुंजलाल यांचे पुत्र आहेत. यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी मंत्री राजकृष्ण गौड यांचे पुत्र भुवनेश्वर गौड आहेत. या निवडणुकीत गोविंद सिंह त्यांच्या जागेवरून पिछाडीवर आहेत, त्यांच्यासमोर भुवनेश्वर गौर आघाडीवर आहेत.
सुरेश भारद्वाज निवडणूक हरले –
कसुंप्ती मतदारसंघातून भाजपचे सुरेश भारद्वाज निवडणूक पराभूत झाले आहेत. भारद्वाज यांच्याकडे सध्या शहरी विकास मंत्रालयाची जबाबदारी होती. या निवडणुकीत भारद्वाज यांचा 8655 मतांनी पराभव झाला. त्यांना काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध सिंग यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
ऊर्जा मंत्री जिंकले –
सुखराम चौधरी हे हिमाचल प्रदेश सरकारमध्ये एमपीपी आणि ऊर्जा मंत्री आहेत. चौधरी या निवडणुकीत पांवटा साहिब विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे किरणेश जंग यांचा 8596 मतांनी पराभव केला आहे.
मंत्री सरवीन यांचा पराभव झाला –
सरवीन चौधरी या जयराम मंत्रिमंडळात मंत्री आहेत. यावेळी त्या शाहपूर मतदारसंघातून रिंगणात होत्या. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरवीन यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यांचा काँग्रेसच्या केवल सिंह यांनी 12243 मतांनी पराभव केला.
दरम्यान, भाजप मंत्रिमंडळात मंत्री असलेले शहरविकास मंत्री सुरेश भारद्वाज, सामाजीक न्याय मंत्री सरवीन चौधरी, शिक्षा मंत्री राम लाल मारकंडा यांचा पराभव झाला आहे तर शीक्षण मंत्री गोविंद सिंह, ग्रामीण विकास पंचायत राज मंत्री वीरेंद्र कंवर , उद्योगमंत्री विक्रम सिंह, आरोग्यमंत्री राजीव सैजल, वन मंत्री राकेश पठानिया, मंत्री राजिंदर गर्ग हे पिछाडीवर आहेत. काॅंग्रेसला 40 जागावंर विजय तर भाजपल 25 जागांवर विजय मिळात आहे..