मुंबई – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली. आतापर्यंत समोर आलेल्या कलावरुन जवळपास चित्र स्पष्ट झालं असून भाजपला गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळताना दिसत आहे. यामध्ये भाजपने सर्वाधिक म्हणजेच 150 च्या वर जागांवर आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले आहे की, गेल्या 24 वर्षांत गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकांचे सर्व विक्रम भाजपाने मोडले. या निवडणुकीत जनतेने भाजपाच्या विजयाला विक्रमाची नवी झालर लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे आणि गुजरातच्या जनतेचे या विक्रमी विजयाबद्दल अभिनंदन.
गेल्या २४ वर्षांत गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकांचे सर्व विक्रम भाजपाने मोडले. या निवडणुकीत जनतेने भाजपाच्या विजयाला विक्रमाची नवी झालर लावली. पंतप्रधान @narendramodi जी, भाजपाचे आणि गुजरातच्या जनतेचे या विक्रमी विजयाबद्दल अभिनंदन.@BJP4India
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 8, 2022
मुख्यमंत्री शिंदेनी पुढे म्हटले आहे की, “मोदींची जादू देशात आणि विदेशात सगळीकडे आहे. आज आपल्याला G-20 चं अध्यक्षपदही मिळालं आहे. हे आपल्या देशासाठी गौरवास्पद आहे. G-20 चं नेतृत्व मोदींनी करणं हीदेखील देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातही मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये 14 बैठका आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं ब्रँडिंग करण्याची संधी प्राप्त झाली आहे,” असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
Gujarat Election Result 2022 : ठरलं! BJP कडून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ बड्या नावाची घोषणा!
दरम्यान, जरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतची माहितीही समोर आली आहे. भाजपने याबाबतची घोषण केली आहे. गुजरातचे वर्तमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. गांधीनगर येथे 12 डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. विधानसभेच्या मागे असलेल्या मैदानात शपथविधी होणार आहे. या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक नेते सहभागी होणार आहेत.