नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या नोकरशाहीत मोठे फेरबदल झाले असून, अनेक आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती तर अनेकांना बढती मिळाली आहे. यापैकी एक नाव म्हणजे डॉ. हरिओम. हे तेच हरी ओम आहेत ज्यांनी 2007 साली गोरखपूरचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांना अटक केली होती. याच हरी ओम यांना योगी सरकारने कल्याण विभागाचे प्रधान सचिव केल्यामुळे आता पुन्हा एकदा आयएएस डॉ. हरिओम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
डॉ. हरिओम गेल्या 5 वर्षांपासून दुर्लक्षित झाले होते. पण मार्च 2022 मध्ये त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेत त्यांना एक पुस्तक सादर केले होते. याचे फोटो सोशल मीडियावरही प्रसिद्ध व्हायरल झाली होती. दरम्यान, हरिओम यांची प्रधान सचिव पदावर नियुक्ती झाल्याने आता ते पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे बोलले जात आहे.
गोरखपूरचे डीएम असताना हरी ओम यांनी तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांना अटक केली होती, त्यावेळी योगी आदित्यनाथ यांना डॉ. हरिओम अधिकारी यांच्याविषयी नाराजी असल्याचे म्हटले जात होते. मात्र, यापूर्वी हरी ओम यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी संबंध सुधारले होते.
दरम्यान, सध्या योगी आदित्यनाथ यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 2007 मधील आहे. या व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ संसदेत रडताना दिसत आहेत आणि विचारत आहेत की, माझ्या संरक्षणाची जबाबदारी या सभागृहाची आहे का? योगी आदित्यनाथ या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत की, मी तिसऱ्यांदा या घरात पोहोचलो आहे. पहिल्यांदा मी 25 हजार मतांनी जिंकून संसदेत पोहोचलो, दुसऱ्यांदा पन्नास हजारांहून अधिक मतांनी जिंकून संसदेत पोहोचलो आणि तिसर्यांदा दीड लाखांहून अधिक मतांनी जिंकून संसदेत पोहोचलो. जर हे सभागृह मला सुरक्षा देऊ शकत नसेल तर मी परत जाईन. राजकीय द्वेषामुळे माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, मला तुरुंगात पाठवण्यात आले. समाजाच्या सुरक्षेसाठी मी माझे कुटुंब आणि आई-वडीलही सोडले आहेत. दरम्यान, हरिओम यांची प्रधान सचिव पदावर नियुक्ती झाल्याने आता ते पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे बोलले जात आहे.