Lonavala breaking news लोणावळा – मळवली पासून जवळच असलेल्या पाटण गावाच्या हद्दीमध्ये एका खाजगी बंगल्यात पॉर्न फिल्म (अश्लिल चित्रपट) बनविणाऱ्या टोळीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चित्रफीत बनवण्यासाठी लागणाऱ्या 6 लाख 72 हजार 620 रुपये किमतीचे साहित्य आणि पाच महिलांसह 18 जणांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. 29) पाटण गावाच्या हद्दीतील आर्णव व्हिला या बंगल्यात अश्लिल व्हिडीयो तयार करण्यात येत असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात बंगल्यात अश्लिल चित्रफीत तयार करीत असताना काहीजण मिळून आले. पोलिसांनी 5 महिला आणि 10 पुरुषांसह बंगला भाड्याने देणाऱ्या आणि तो चालवणारे 3 जण अशा एकूण 18 जणांना ताब्यात घेतले. चित्रफीत तयार करण्यासाठी वापरलेले दोन कॅमेरे, वेगवेगळ्या लाईट, वायरलेस माईक, लॅपटॉप आदी मुद्देमाल जप्त केला आहे.
विष्णु मुन्नासाहब साओ (वय ३० वर्षे, रा. परगना, कोलकत्ता), जावेद हबीबुल्ला खान (वय ३५ वर्षे, रा.बस्ती, उत्तरप्रदेश), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (वय २९वर्षे, रा. चंद्रपुर), समीर मेहताब आलम (वय २६ वर्षे, रा. अमरोहा, उत्तरप्रदेश), अनुप मिथीलेश चौबे (वय २९ वर्षे, रा. कांदिवली ईस्ट, मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (वय २१ वर्षे, रा. रोनक सिटी, हरियाणा), राहुल सुरेश नेवरेकर (वय ३८ वर्षे, रा. वागळे इस्टेट, ठाणे), अनिकेत पवन शर्मा (वय १९ वर्षे, सुरत, गुजरात), वंशज सचीन वर्मा (वय २१ वर्षे, रा. डेहराडुन) आणि मनीष हिरामण चौधरी (वय २० वर्षे, रा.शास्त्रीनगर, हरीयाणा) यांना ताब्यात घेतले.
याशिवाय सुखदेव चांगदेव जाधव (वय ५२ वर्षे) आकेश गौतम शिंदे (वय ३२ वर्षे) व सनी विलास शेडगे (वय ३५ वर्षे, सर्व रा.मळवली, ता. मावळ, जि. पुणे) यांनी स्वतःचे आर्थिक फायदया करीता संबंधित पुरुष व महिलांना त्यांचे कोणत्याही प्रकारची ओळखपत्रे न घेता, बंगला भाड्याने दिल्याने तिघांही अटक केली आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे करीत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक रमेश चोपडे, लोणावळा उपविभागाचे सहायक अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ उपनिरीक्षक भारत भोसले, सागर अरगडे, अंमलदार अजय दरेकर, महेंद्र वाळुंजकर, युवराज बनसोडे, बाळकृष्ण भोईर, दुर्गा जाधव, पुष्पा घुगे, रुपाली पोहीनकर, सागर धनवे, सूरज गायकवाड यांनी केली.