Kartiki Gaikwad Pregnant| ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमधून घराघरात पोहचलेली गायिका कार्तिकी गायकवाडने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे. 2020 साली लग्नबंधनात अडकल्यानंतर आता कार्तिकी लग्नाच्या चार वर्षानंतर आई होणार आहे. सध्या तिचे डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कार्तिकी गायकवाडच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. गायिकेच्या डोहाळे जेवणाची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. कुणीतरी येणार येणार गं! असा संदेश लिहिलेली भव्य रांगोळी, कार्तिकीची नवऱ्यासह ग्रॅन्ड एन्ट्री व अन्य कुटुंबीयांची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. डोहाळे जेवणासाठी गायिकने खास लूक केला होता. हिरव्या रंगाच्या साडीवर तिने हलव्याचे दागिने परिधान केले होते. सध्या तिच्या या लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
कार्तिकीने डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘ओटीभरण कार्यक्रमातील आनंदाचे क्षण’ असे लिहिले आहे. कार्तिकीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. या फोटोवर कार्तिकीच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, कार्तिकीने 2020 मध्ये रोनित पिसेसोबत लग्न केले होते. तिचे पती व्यावसायिक आहेत. कार्तिकीचा चाहता वर्ग मोठा आहे. कार्तिकी आणि रोनित नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आता लवकरच या जोडप्याच्या घरी बाळाचं आगमन होणार आहे. यावेळी कार्तिकीसह तिचे कुटुंब देखील आनंदात असल्याचे फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :