पोरबंदर (गुजरात) – गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पोरबंदर शहरातून आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित एका विदेशी नागरिकासह चार जणांना अटक केली आहे. एटीएसचे विशेष पथक गेल्या काही दिवसांपासून पोरबंदर आणि परिसरात विशेष कारवाईसाठी सक्रिय होते.
एटीएसने पाळत ठेऊन दहशतवादी संघटनेशी संबंधित एका परदेशी नागरिकासह या चार जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुराव्यानिशी आढळून आले आहे.
अटक करण्यात आलेल्या परदेशी नागरिकाशी संबंधित सर्व स्थानिक व्यक्तींचीही छाननी सध्या व्यापक स्तरावर करण्यात येत आहे. हा तपास पुर्ण झाल्यानंतर या दहशतवाद्यांच्या संबंधातील माहिती जाहीर केली जाणार आहे. पण तो पर्यंत त्यांनी या कारवाईचा आणखी तपशील देण्यास नकार दिला आहे.