नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील गँगस्टर आणि माजी आमदार मुख्तार अन्सारीला गाझीपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने गँगस्टर अॅक्ट प्रकरणात दोषी ठरवल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे. न्यायालयाने त्याला 10 वर्षांची शिक्षेसह त्याला 5 लाखांचा दंडही ठोठावला आहे.
मुख्तार अन्सारी याचा भाऊ आणि बसपा खासदार अफजल अन्सारी यांच्यावर न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नाही. त्यांच्याविरोधातही न्यायालय दुपारी 2 वाजेपर्यंत निकाल देईल, अशी शक्यता आहे.
यूपीतील प्रसिद्ध कृष्णानंद राय हत्या प्रकरण आणि व्यापारी नंदकिशोर रुंगटा अपहरणानंतर मुख्तार आणि अफजल यांच्यावर गँगस्टर अॅक्टतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अफजल अन्सारी, त्याचा भाऊ माफिया डॉन मुख्तार अन्सारी आणि मेहुणा एजाझुल हक यांच्यावर गँगस्टर अॅक्टतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एजाजुल हक यांचे निधन झाले आहे. या प्रकरणाची सुनावणी १ एप्रिल रोजी पूर्ण झाली. यापूर्वी या प्रकरणाचा निर्णय 15 एप्रिलला येणार होता, मात्र नंतर ही तारीख वाढवून २९ एप्रिल करण्यात आली. या प्रकरणी गाझीपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयात २०१२ साली खटला सुरू झाला.