नवी दिल्ली – भारतीय प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावणार होते. मात्र देशातील करोना परिस्थिती बिघडत चालल्याने त्यांनी भारत दौरा रद्द केला आहे. याबाबतची माहिती जॉनसन यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
“पंतप्रधान जॉनसन यांनी आज सकाळी भारताचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण आपला नियोजित भारत दौरा रद्द करत असल्याची माहिती देत दिलगिरी व्यक्त केली.” असं वक्तव्य जॉनसन यांच्या कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू वेगाने पसरत असून त्याला अटकाव करण्यासाठी देशव्यापी लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे विषाणूला रोखण्याच्या उपाययोजनांवर काम करण्यासाठी यावेळी मायदेशातउपलब्ध राहणं अधिक महत्वाचं असल्याचं पंतप्रधान जॉनसन यांनी म्हटलंय.