गौतम अदानी होणार ‘धर्मा प्रोडक्शन’चे 30 टक्के भागीदार

मुंबई – बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या प्रोडक्शन हाऊस असलेल्या ‘धर्मा प्रोडक्शन’ मध्ये भागीदार म्हणून आता देशातील एक मोठे नाव जोडले जाणार आहे. निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांच्यासमवेत भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी भागीदारीसाठी हातमिळवणी केली असून जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये 30 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत ते आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

2021 मध्ये करण जोहर मोठे बजेट असलेले बरेच चित्रपट घेऊन येत आहे आणि त्यांच्या या चित्रपटांमध्ये प्रसिध्द अभिनेते आणि अभिनेत्री काम करणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये करणला प्रोजेक्ट्स चालविण्यासाठी खूप पैशांची गरज भासणार आहे. करण जोहरची ही गरज पूर्ण करण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

करण जोहरची धर्मा प्रोडक्शन ही सर्वात मोठी कंपनी असून बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चित्रपट बनवते. रणवीर-आलिया आणि अमिताभ बच्चन यांचा आगामी ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अद्याप पूर्ण झाला नाही आणि त्याचे बजेट 300 कोटींच्या वर गेले आहे.

याशिवाय ‘जुग जुग जियो’, ‘शेरशाह’, ‘रणभूमि’, ‘दोस्ताना 2’ ते ‘सूर्यवंशी’ हे धर्मा प्रॉडक्शनचे मोठ्या बजेटचे चित्रपट आहेत. भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी गौतम अदानी एक आहेत. त्यांनी यूपीमध्ये 35 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. जर करणचा आणि गौतम अदानी हा करार झाला आणि अदानी-करण मिळून बॉलिवूडचे चित्र बदलू शकतील, अशी चर्चा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.