छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांची संपत्ती मंत्रिपदाच्या काळात तब्बल अडीचपटीने वाढली आहे. त्यांच्याकडील मालमत्तेचे बाजारमूल्य ५.७० कोटींच्या वर आहे. मात्र, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे भुमरेंपेक्षा अधिक श्रीमंत आहेत. भुमरेंची श्रीमंती सत्तेत गेल्यापासून मात्र मागील पाच वर्षांत झपाट्याने वाढली आहे, तर खैरेंची जैसे थे आहे.
आमने-सामने निवडणूक लढवणाऱ्या दोन शिवसैनिकांनी निवडणूक आयोगाकडे त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब पुढे आली आहे. सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरणारे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे ८ कोटी ८३ लाख ९४ हजार ७४४ रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी जाहीर केले,
तर त्यांचे प्रतिस्पर्धी मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे ५ कोटी ७० लाख ९३ हजार ९४६ रुपयांची मालमत्ता आहे. विशेष म्हणजे मागील वेळी पराभूत झालेल्या खैरेंच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत घट झाली, तर भुमरेंची संपत्ती मात्र सत्तेत गेल्यावर अडीचपटीने वाढली आहे.
नुकतंच खैरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर क्रांती चौक ते संस्थान गणपती मंदिरापर्यंत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढली. खुर्चीची लालसा अन् तुरूंगाला घाबरून गुजरातच्या दावणीला गेलेल्यांवर जनतेचा विश्वास नाही, अशी टीका ठाकरे यांनी शिंदे गटाचे नाव न घेता या वेळी केली.
खैरेंकडे ४३, तर भुमरेंकडे ४५ तोळे सोने
खैरे यांनी नेहमीप्रमाणे स्वत:च्या नावे १९७९ सालची २० हजारांची फियाट कार तर पत्नीच्या नावे सफारी कार दाखवली असून तिची किंमत ५० हजार सांगितली आहे. भुमरेंकडे २८ लाखांची फॉर्च्युनर आहे. सोन्याच्या बाबतीत दोन्ही शिवसैनिक सारख्याच पातळीवर आहेत.
खैरेंकडे ४३ तोळे, तर भुमरेंकडे ४५ तोळे सोने आहे. खुर्चीची लालसा अन् तुरूंगाला घाबरून गुजरातच्या दावणीला गेलेल्यांवर जनतेचा विश्वास नाही, अशी टीका ठाकरे यांनी शिंदे गटाचे नाव न घेता या वेळी केली.
खैरेंची संपत्ती घटली, भुमरेंची वाढली
सन खैरेंची संपत्ती भुमरेंची संपत्ती
२०१४ १.४१ कोटी ४ कोटी
२०१९ ९ कोटी २ कोटी
२०२४ ८.८३ कोटी ५.७० कोटी
दोघांचेही उत्पन्न
सन चंद्रकांत खैरे संदिपान भुमरे
२०१९ १३,२३,१०१ १९,१०,८९०
२०२४ १३,०६,००० ५४,६२,५०६