नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘हरिजन’ शब्दाऐवजी आता ‘डॉ. आंबेडकर’ शब्द वापरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल यांनी ‘हरिजन’ शब्दाऐवजी ‘डॉ. आंबेडकर’ शब्द वापरण्याची अधिसूचना जारी केली आहे. “लवकरच हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
केजरीवाल सरकारच्या या नव्या नियमांमुळे आता दिल्लीतील वस्ती आणि रोड या ठिकाणांवर ‘हरिजन’ ऐवजी होणार ‘डॉ. आंबेडकर’ शब्दाचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. समाज कल्याण मंत्र्यांनी यासंदर्भात आवश्यक पावले उचलण्यासाठी बैठक बोलावली होती समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी दिल्ली सचिवालयात कायदा विभाग आणि नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी सर्व गल्ल्या, वस्त्या, दवाखाने आणि वसाहतींमध्ये ‘हरिजन’ शब्दाच्या जागी ‘डॉ. आंबेडकर’ असा शब्द लिहीण्याचा प्रस्ताव सादर केला.
हरिजन हा शब्द वापरू नये, अशा मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने दिल्यानंतर ही बैठक झाली. या बैठकीत ‘डॉ. आंबेडकर’ या शब्दाच्या जागी ‘हरिजन’ शब्द टाकण्याची अधिसूचना काढण्यात आली आणि ही अधिसूचना लवकरात लवकर लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
केजरीवाल सरकारने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी संबंधित विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भात कारवाई करून अधिसूचना जारी केली. त्यांनी सांगितले आहे की, दिल्लीती सर्व वसाहती, गल्ली आणि रस्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावं, असा प्रस्ताव आम्ही मांडला आहे.