हरियाणामधील प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीही अपघातातुन थोडक्यात बचावली आहे. सपना खरेदीसाठी जात असताना तिच्या फॉर्च्युनर गाडीला वेगाने आलेल्या एका वाहनाने मागून धडक दिली. हा अपघात नवी दिल्लीतील गुरुग्राम येथे घडला. सुदैवाने सपना चौधरी या अपघातात बचावली आहे.
सपना काही दिवसांपूर्वी आपल्या ड्रायव्हरसोबत शॉपिंगसाठी गेली होती. त्यावेळी दिल्लीतील वाटिका चौकाजवळ मागून वेगाने आलेल्या एका गाडीने तिच्या गाडीला धडक दिली. सपनाच्या ड्रायव्हरने त्या गाडीच्या चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने त्या ठिकाणाहून पळ काढला.
मात्र यात तिच्या गाडीचे नुकसान झाले आहे. याबाबत तिने अद्याप तक्रारी केलेली नाही. पण जर याबाबत तक्रार आली तर त्या चालकावर नक्कीच कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, सपना चौधरी सध्या हरियाणातील एका चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर ती हिंदी बिग बॉसमध्येही दिसली होती. बिग बॉसमध्ये ती चांगलीच चर्चेत आली होती. घराघरात तिच्या नावाचीच चर्चाही रंगू लागल्या होत्या. विशेष म्हणजे बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिला लगेचच भोजपूरी चित्रपटाची ऑफर मिळाली होती.