पुणे : वानवडी परिसरातील भैरोबा नाला चौकातील पेट्रोल पंपाजवळ शनिवार रात्री साडे आठच्या सुमारास दोन दुचाकींचा अपघात झाला. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीस्वराला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तेथून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मोहम्मद कैफ मोसिन शेख (वय. 20,रा. सय्यद नगर) याचा जागीच मृत्यू झाला आहे तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तर प्रसाद रामकृष्ण राजम(वय. 25,रा. एस आर पी एफ ग्रुप 1) हा गंभीर जखमी झाला.
असून त्याला ससून रुग्णालय सुरुवातीला दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची देखील प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुचाकींची धडक एवढी जोरात होते की दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.