चिंबळी – मेदनकरवाडी (चाकण, ता. खेड) येथे 11 लाख रक्कमेच्या 4 इंची पिण्याच्या पाइपलाइनच्या कामाचे भूमिपूजन रामदास मेदनकर यांच्या हस्ते करण्यात आले. अर्बनग्राम ते ट्युलिप होम्सपर्यंत ही लाइन टाकली जाणार आहे. याप्रसंगी उपसरपंच दिपीका गोरे, ग्रामपंचात सदस्य महेंद्र मेदनकर, अमित मेदनकर, नंदाराम भुजबळ, संदीप मेदनकर, पांडुरंग कांबळे, जगदीश मेदनकर, ग्रामविकास अधिकारी अरुण हुलगे, दत्तात्रय गोरे, शिवाजी भुजबळ आदी उपस्थित होते.