भोर – भोर प्रशासनाने जाहिर केलेला भोर शहर लॉकडाऊनचा निर्णय प्रशासनाने मागे घेतल्याने भोर शहरात माञ दुकाने उघडी पण ग्राहकच नसल्याने रस्त्यावर होणारी गर्दी रोडावली होती.
भोर तालुक्यात मंगळवार (दि. 1) व बुधवार (दि.2) या दोन दिवसांत 43 जणांचे करोना आहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तालुक्यातील बाधितांचा आकडा 663 वर पोहचला असून 423 जणांनी करोनावर मात केली असल्याचे गटविकास आधिकारी विशाल तनपूरे यांनी सांगितले.
मागील दोन दिवसांत उत्रौली2, पसूरे 1, नसरापूर 1, वरवे 2, येवली 2, नांदगाव 10, बाजारवाडी2, पारवडी1, केळावडे 1, बारे 1, करंजे 1, आंबवडे 1, पिसावरे 1, नर्हे 1, ससेवाडी 1, कापुरहोळ 2, गणेश नगर 1, भोर शहर 11, असे एकूण 43 जणांचे आहवाल पॉझिटीव्ह आले असून 202 जणांवार उपचार सुरू आहेत. तर आज खेर तालुक्यातील 22 जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, बुधवारी 79 संशयीतांची अँन्टिजेन चाचणी करण्यात आली असल्याचे डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.