शिक्रापूर (पुणे) – वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील एका युवकाचे त्याच्या मित्रांनी उसण्या पैशांच्या वादातून अपहरण करत युवकावर खुनी हल्ला केला होता. या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीस शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.
गणेश सुभाष जाधव (वय 33, रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) असे आरोपीचे नाव आहे. निलेश बबन भंडारे (रा. वढू बुद्रुक) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. निलेश भंडारे याने गणेश जाधव याला एक लाख रुपये उसने दिले होते; मात्र भंडारेला आर्थिक अडचण असल्याने तो जाधव याचेकडे पैसे मागत होता. 26 ऑगस्ट रोजी जाधव याने भंडारे याला फोन करून बोलावून त्याच्यावर खुनी हलल केला. त्याचे अपहरण करत नंतर त्याला सोडून दिले. त्याची कार व मोबाईल घेऊन पळून गेले होते. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी गणेश जाधव व दत्ता फुलारे दोघे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले होते.पैकी गणेश जाधवला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.