कोल्हापूर – एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मराठा आरक्षण आणि मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी सदावर्ते यांच्यावर कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु कोल्हापूर पोलिसांनी चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलीसांनी काही पुराव्यांच्या आधारे तपास सुरु केला आहे. अनेक गोष्टी पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केल्या होत्या तसेच सदावर्तेंनी स्वतः कबुल केले की, काही गोष्टी आंदोलनादरम्यान रेकॉर्ड झाल्या आहेत. यानंतर न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.