पिंपरी – एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर अश्लील कमेंट करणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 4) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.
अक्षय श्रीमंत कसबे (वय 30, रा. भीमशक्ती नगर, मोरे वस्ती, चिखली) यांनी गुरुवारी (दि.5) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय अ. नायकिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर भोंगे जबरदस्तीने काढले जात असतील तर रिपाईचे कार्यकर्ते मशिदीला संरक्षण देतील अशी पोस्ट होती. या फेसबुकच्या पोस्टवर आरोपी नायकिंदे याने अश्लील भाषा वापरत आक्षेपार्ह कमेंट करून भावना दुखावल्या.