पिंपरी – पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह केला. तसेच महिलेचे पैसे देखील हडपले. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अमरावती येथे घडली. विष्णू वामन ठाकरे (वय 52), असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (दि. 5)दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी ठाकरे यांनी पहिल्या पत्नी पासून घटस्फोट न घेता फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यानंतर फिर्यादी यांची आई व फिर्यादी यांच्याकडून बॅंकेतील दोन लाख 30 हजार रुपये रक्कम कर्जाच्या स्वरूपात काढण्यास भाग पाडले. फिर्यादी यांच्याकडून ती रक्कम घेऊन परत न देता शिवीगाळ केली.
फिर्यादी यांच्या मुलीला चाकूने मारहाण करून घरातून निघून जाण्यास भाग पाडले. फिर्यादी यांचा दोन तोळ्याचा सोन्याचा नेकलेस परत न करता त्याचा अपहार केला. हा गुन्हा अमरावती जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.