Mark Zuckerberg loss of Crores| जगभरात मंगळवारी व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या सेवा काही काळासाठी बंद झाल्या होत्या. यानंतर युजर्समध्ये एकच गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी अनेक युजर्सनी अचानक फेसबुक लॉग आऊट केल्याने त्यांच्यात संभ्रम पसरला. तसेच जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपनीच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र काही तासांनी ही सेवा सुरळीत झाली, मात्र तोपर्यंत मेटाचं अब्जावधींचं नुकसान झाले.
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गला या घटनेमुळे चांगलाच फटका बसला आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटा या कंपनीचे शेअर्स 1.5 टक्क्यांहून अधिक घसरले. या मोठ्या डाउन टाइममुळे मार्क झुकरबर्गचे मोठे नुकसान झाले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या कामकाजात व्यत्यय आल्याने मार्क झुकरबर्गला मंगळवारी 100 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाल्याचे झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. भारतीय चलनानुसार तब्बल 8 अब्ज रुपयांहून अधिक हा आकडा आहे.
मंगळवारी सोशल मीडिया साइट Twitter वर, मेटाच्या एनडी स्टोनने आपल्या वापरकर्त्यांना आश्वासन दिले होते की ते समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. फेसबुक आउटेजच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून वापरकर्त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे निवेदन या संदर्भात जारी करण्यात आले होते.
मेटाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्याची समस्या 2021 मध्ये एकदा आली होती जेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 7 तास बंद होते. यावेळी मात्र अवघ्या 2 तासात हा प्रश्न सोडवण्यात यश मिळाले. यापूर्वी 2021 साली देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना टेक्निकल ग्लिचचा सामना करावा लागला होता. त्या वेळी तब्बल सात तासांसाठी सर्व सोशल मीडिया साईट्स बंद होत्या. यावेळी मात्र दोन तासांमध्येच सर्व सेवा पूर्ववत झाल्या.
दरम्यान, मार्क झुकरबर्ग हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत (फोर्ब्स रियल टाइम बिलियनेयर्स) पाचव्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 139.1 बिलियन डॉलर इतकी असल्याचे यात सांगितले जात आहे.