पुणे – भारती विद्यापीठ पोलिसांनी स्वामी नारायण मंदिरा शेजारील बंगल्यात कुख्यात गुंड चुहा जमीर सय्यद उर्फ तौसिफ यास पकडले. त्याच्यावर तीन खुनाचे प्रयत्न, जातीय दंगल, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्द करण्यात आले आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बी.आर.कोते पथकास पेट्रोलिंग करत असताना, पोलीस कर्मचारी सर्फराज देशमुख व राहुल तांबे यांना खबर मिळाली की सराईत गुन्हेगार चुहा सय्यद हा एका पडीक बंगल्यात लपून बसला असल्याची खबर मिळाली होती.
त्यानूसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्याला पकडले. चुहा सय्यदवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला स्थानबध्द करण्याचे 19 सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्तांनी दिले होते. तेव्हापासून तो फरार होता.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर, पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक भुषण कोते, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, सर्फराज देशमुख, अभिजीत जाधव, राहुल तांबे,सचिन पवार, गणेश शेंडे, जगदीश खेडकर, गणेश सुतार यांच्या पथकाने केली.