शिंदे वासुली : भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांची आज पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी झालेली बैठक प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने योग्य निर्णय न झाल्याने फिस्कटली. ताबडतोब सर्व प्रकल्पग्रस्तांनी आसखेड हद्दीतील सुरू असलेल्या जलवाहिनीचे काम बंद करण्यासाठी ठिकाणी धाव घेतत जलवाहिनीचे काम थांबवले.
आमदार दिलीप मोहिते यांच्या आश्वासनानंतर भामा आसखेडग्रस्तांनी शुक्रवारी (दि. 21) आंदोलन मागे घेतल्यामुळे काम जलदगतीने सुरू होते. तर पोलीस प्रशासन काही अंशी “बिनधास्त’ होते. मात्र, आज अचानक प्रकल्पग्रस्तांनी जलवाहिनीच्या कामावर हल्लाबोल केल्यामुळे पोलीस प्रशासन व कामगारांची थोडी गडबड झाली. दरम्यान, पोलीस प्रशासनाचे कोणीही वरिष्ठ अधिकारी सध्या तरी घटनास्थळी उपस्थित नव्हते.