केतकावळे : अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम बुधवारी (दि. 5) होत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे अक्षेपार्ह संदेश किंवा माहिती सोशल मीडियावर व्हायरल करू नये. दोन समाजात जातीय तेढ व धार्मिक तेढ निर्माण होईल असे किंवा कोणतेही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश पसरवू नयेत अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले. हे टाळण्यासाठी ऍडमीनने ग्रुपची सेंटीग सेंड मॅसेज ऑनली ग्रुप ऍडमीन अशी करावी, असे आवाहन भोर-पुरंदरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले आहे.
राम मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतील अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करू नये. लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही. तसेच प्रशासनावर ताण निर्माण होणार नाही. जर अशा स्वरूपाचे मेसेज आपल्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास त्या ग्रुप ऍडमिनवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.