अरे बापरे ! खेडने ओलांडला दीड हजारांचा टप्पा

24 तासांत 44 बाधित, एकाचा मृत्यू : तालुक्‍यातील 85 गावांत संक्रमण

राजगुरूनगर : खेड तालुक्‍यात 24 तासांत 44 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आळंदी नगरपरिषद हद्दीततील 72 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. तालुक्‍यातील बाधितांची संख्या 1535 वर पोहोचली आहे, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

खेड तालुक्‍यात चाकण परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. चाकण नगरपरिषद आणि त्या परिसरातील गावांमध्ये करोनाने फास आवळला आहे. त्यापाठोपाठ राजगुरूनगर आणि आळंदी नगरपरिषद हद्दीत करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. खेड तालुक्‍यात सुमारे 85 गावांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. तर ग्रामीण भागातील विविध गावात 17, चाकण 11, आळंदी 5 व राजगुरूनगर 1 असे एकूण 34 मृत्यू तालुक्‍यात करोनामुळे झाले आहेत.

मागील 24 तासांत चाकण 7, आळंदी 12, राजगुरूनगर 4 अशा तीन नगर परिषदांमिळून 23 तर तालुक्‍यातील ग्रामीण भागातील बुट्टेवाडी 1 भांबुरवाडी 1, तिन्हेवाडी 2, येलवाडी 1, आंबेठाण 3, वराळे 4 मेदनकरवाडी 2, म्हाळुंगे 1, चिंबळी 1, खालूंब्रे 1, मोई 3, कडूस 1 अशा 12 गावांत 21 अशा एकूण 44 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

खेड तालुक्‍याची करोना विषाणू संसर्ग आकडेवारी

तपशील.. एकूण बाधित व्यक्ती.. करोनामुक्त व्यक्ती.. मृत्यूची संख्या.. उपचार घेत असलेल्या व्यक्ती.. 24 तासात बाधित व्यक्ती
ग्रामीण क्षेत्र.. 898.. 653.. 17.. 228.. 21
चाकण नगरपरिषद.. 331.. 211.. 11.. 109.. 7
आळंदी नगरपरिषद.. 150.. 97.. 5.. 48.. 12
राजगुरूनगर नगरपरिषद.. 159.. 129.. 1.. 29.. 4
एकूण.. 1538.. 1090.. 34.. 414.. 44

भीमाशंकर देवस्थानने 10 व्हेंटिलेटर द्यावीत

खेड तालुक्‍यातीळ महाळुंगे इंगळे कोविड केअर सेंटर, चांडोली व तालुक्‍यातील डीसीएचसीसाठी खेड तालुक्‍यातील श्री भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून 10 व्हेंटिलेटर उपलब्ध करावित अशी मागणी खेड पंचायत सभापती अंकुश राक्षे यांनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्याकडे केली आहे. तालुक्‍यातील शासकीय व खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांवर उपचार करताना त्याची कमतरता भासते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.