नवी दिल्ली – आपलं उत्पादन इतर व्यवसायिकांपेक्षा वेगळं असावं असं प्रत्येक दुकानदाराला वाटतं असतं. असंच काहीसं चहाच्या कित्येक दुकानांच्या बाबतीत आपल्या प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं. प्रेमाचा चहा, आपुलकीचा चहा, मैत्रीचा चहा विवध नावांचे अमृततुल्य असे कित्येक चहाचे दुकान तुम्ही पाहिले असेल. मात्र प्रेमात धोका मिळालेल्यांसाठी ‘बेवफा चाय वाला’’ हे नाव ऐकलंय का? नाही नं… तर जाणून घेऊया सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या चहावाल्याविषयी…
मध्य प्रदेश मधील भिंड जिह्ल्यात प्रेमात धोका मिळालेल्या लोकांसाठी दीपक परिहार नावाच्या व्यक्तीने ‘बेवफा चाय वाला’’ या नावाने चहाचे दुकान सुरू केले आहे. काही पत्रकारांनी त्याला या नावाबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, मला प्रेमात धोका मिळाला असून मी ते दुःख सहन केले आहे. म्हणूनच या नावाने चहाचे दुकान सुरू केले आहे.
Guys ye hai hamare lucknow ka famous “bewafa chai wala” Tea stall yahan per person 10 rs. Chai hai but yahan couples ke liye 15 rs. Ki 2 cups chai hai 5 rs. Ka discount maine 10 ki pi hai…
I want #behir yahan chai piye hihihi 😋😋😋😋😝after fight and tandaav #Naagin3 pic.twitter.com/KWI15SmKZQ— SurbhiJKiDiwani_sandy #QuboolHai2.0comingsoon 💖 (@Surbhijkidiwani) January 6, 2019
सध्या सोशल मीडियावर दीपकच्या या दुकानाचे व्हिडियो चांगलेच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या ‘बेवफा चाय वाला’ दुकानात स्पेशल ऑफर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या दुकानात एखादा प्रेमी युगुल चहा पिण्यासाठी आल्यास चहा त्यांना 20 रुपयात दिला जातो. तर प्रेमात धोका मिळाला असेल तर त्यांच्यासाठी हा चहा १५ रुपयात दिला जातो. देशातील जवानांसाठी हा चहावाला चहा फ्री मध्ये देत असतो.