#Prokabaddi2019 : जयपूरचा निसटता विजय

मुंबई – जयपूर पिंकपॅंथर्सने बंगाल वॉरियर्सवर 27-25 असा विजय मिळविला. कबड्डीत कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे बदलले जाऊ शकते. जयपूर संघाविरुद्ध बंगालने मध्यंतराला 14-10 अशी आघाडी घेतली होती. या आघाडीच्या जोरावर सामन्याच्या शेवटच्या पाच मिनिटांपर्यंत त्यांच्याकडेच विजयाचे पारडे झुकले होते.

जयपूरच्या संदीप धूल व दीपक हुडा यांनी त्यानंतर जोरदार चढाया करीत बंगालची आघाडी कमी केली. एक मिनिट बाकी असताना बंगालकडे 24-23 अशी आघाडी होती. त्यांच्या चाहत्यांनी विजयाचा आनंद घेण्याची तयारीही सुरू केली. मात्र दीपक हुडाने बंगालच्या रिंकू नरवाला बाद करीत लोण चढविला. हाच लोण बंगालला महागात पडला.

जयपूरने तेथे 26-24 अशी आघाडी घेतली. शेवटपर्यंत आघाडी आपल्याकडे घेत जयपूरने विजयश्री खेचून आणली. यावेळी बंगालच्या खेळाडू हताशपणे आपण कसे हरलो याच विवंचनेत पडले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.