स्विमिंग पूलमध्ये पूजा बत्राचा योगा

बॉलीवूडमधील अभिनेत्री पूजा बत्रा ही लग्नापूर्वी प्रसिद्धीपासून एकदमच दुर होती. परंतु नवाब शाहसोबतच्या अफेअर आणि त्यानंतर गुपचुप लग्न केल्यानंतर ती पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तेव्हापासून पूजा बत्रा सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह झाली आहे. पूजा सतत आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असती. या फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असतो.

पूजाने नुकताच एक फोटो पोस्ट केल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. या फोटोत ती स्विमिंग पूलमध्ये योगा करताना दिसते. पूजाहा हा अंदाज तिच्या चाहत्यांना हैराण करणार आहे. या फोटोतील तिचा लुक आणि सुंदरतेची चाहते तोंड भरून कौतुक करत आहेत.

दरम्यान, पूजा बत्राने 4 जुलै रोजी आर्य समाजाच्या पद्धतीने नवाब शाहसोबत लग्न केले होते. या सोहळयाला फक्‍त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्रमंडळीच हजर होती. बॉलिवुडमधील 90च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी पूजा ही एक अभिनेत्री होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)