मुंबई – एरवी फक्त आपल्या फॅशनमुळे प्रसिद्धीत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद आता अनेक कारणांमुळे चर्चेत येत आहे. कधी ती राजकीय कारणांमुळे चर्चेत येते तर कधी अंगभर कपडे परिधान केले तरीही व्हायरल होते.गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वाद विवादांमुळे उर्फी चांगलीच प्रसिद्धी झोतात होती. आता विमानतळावरील एका व्हिडीओमुळे उर्फीची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
उर्फीच्या फॅशनबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर “माझा नंगा नाच सुरूच राहील” असा इशारा उर्फीने दिला होता. परंतु विमानतळावर चक्क ती पूर्ण आणि साध्य कपड्यांमध्ये दिसली.उर्फीला असं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. इतक्यात विमानतळावरच एका तरुणाने गुलाबाचे फुल देत थेट प्रपोझ केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
चाहत्यांनी उर्फीच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंट केल्या आहेत. चांगले कपडे घातल्याचा फायदा… असं म्हणत एका युजरने उर्फीचे अभिनंदन केले आहे. तर दुसऱ्या युजरने काँट्रॅव्हर्सीपेक्षा अशीच साधी रहा असा सल्ला उर्फीला दिला आहे. गुडघ्यावर बसून उर्फीला प्रपोज करणारा हा चाहता नेमका कोण होता हे अद्याप समजू शकलेल नाही.