नवी दिल्ली – “माझं लग्न झालेलं असून मला एक मुलगा आहे”, त्यामुळे मला मिस वर्ल्ड स्पर्धेतून दूर ठेवण्यात आले आहे. असं वक्तव्य माजी मिस यूक्रेन ‘वेरोनिका डिडुसेनको’ने केलं आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे वेरोनिका मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेत विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं समोर आलं आहे. वेरोनिका डिडुसेनकोन हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.
तिने आपल्या पोस्टमध्ये लिहलं की, माझं लग्न झालेलं असून मला एक मुलगा आहे म्हणून, मिस यूक्रेनचा किताब जिंकल्यानंतरही मला ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतून दूर ठेवण्यात आलं. मला माझा किताब परत नकोय. पण स्पर्धेचे नियम बदलण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून याचा इतर महिलांना जास्त फायदा होईल. असं वेरोनिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हंटल.
गेल्या वर्षी मिस यूक्रेन या किताबाने वेरोनिकाला गौरविण्यात आले होते. पण जेव्हा मॅनेजमेन्टला ती आई असल्याचं कळलं, तेव्हा अवघ्या चार दिवसांमध्येच तिच्याकडून हा किताब परत घेण्यात आला.