७२४ व्या संजीवन समाधी सोहळयास प्रारंभ

पुणे: हैबत बाबांच्या पायरी पूजनाने ७२४ व्या संजीवन समाधी सोहळयास बुधवार ( दि.२० ) पासून प्रारंभ झाला. पंढरपूर मधील संत नामदेव पायरी प्रमाणेच आळंदीत माऊली चरणी हैबत बाबा यांची पायरी असून, त्यांच्या परंपरागत पायरी पूजनाने सोहळ्याला प्रारंभ होत असतो.

पहाटे पवमान अभिषेक व दुधआरती,सकाळी भाविकांच्या महापूजा हे नित्य कार्यक्रम उरकल्या नंतर सकाळी साडे नऊ वाजता मुख्य महाद्वारा समोर असलेल्या हैबतबाबांच्या पायरीचे पूजन विधीवत मंत्रोपचार करत हैबत बाबांचे वंशज पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर -पवार, राजेंद्र आरपळकर व समस्त आरपळकर कुटुंबीय,संस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड.विकास ढगे पाटील,विश्वस्त अभय टिळक, डॉ.अजित कुलकर्णी यांचे हस्ते पायरीचे पूजन करण्यात आले.

मंत्रोपचार व धार्मिक विधी मोरेश्वर जोशी व इतर ब्रम्हवृंदानी केले.यावेळी माऊलींचे चोपदार हभप.कृष्णराव चोपदार,भाऊसाहेब फुरसुंगीकर,आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर,पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील,ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर,संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,श्रीधर सरनाईक,नगरसेवक संतोष गावडे,पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे,मारुती महाराज कोकाटे,मानकरी दिनेश कुऱ्हाडे,बाळासाहेब कुऱ्हाडे,राहुल चिताळकर, माऊली गुळुंजकर,आळंदीकर ग्रामस्थ,भाविक वारकरी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)