ज्ञानोबा.. माऊली.. तुकाराम…

पेठ वार्ताहर: ज्ञानोबा.. माऊली.. तुकाराम’, असा जयघोष, विठूनामाचा गजर करणारे भाविक, ठिकठिकाणी दिंडीचे करण्यात येणारे स्वागत, असे उत्साही वातावरण सध्या पेठ ता आंबेगाव परिसरात दिसून येत आहे.

देवळात, राऊळात, सभामंडपात, मंदिरात, मंदिराभोवती, शाळेच्या मोकळ्या मैदानावर प्रदक्षिणामार्गावर, पेठ गावात, पंचक्रोशीत वारकरीच वारकरी दाटले आहेत. आसमंतातला कण न् कण चैतन्याने भरून-भारून गेला आहे.
पहाटेच्या सुमारास अत्यंत रमणीय वातावरण सध्या सर्वत्र दिसून येत आहे.

दिंडी म्हटले कि अनेक वारकरी वेगवेगळ्या भुमिका निभावतात. संत, सज्जन, भोळेभाळे वारकरी, भजनकरी, दिंडी प्रमुख, विणेकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य फडकरीत्र, दिंडीकरी, सेवेकरी, झेंडेधारी, पताकाधारी, भेरीवादक, निशाणधारक, शिंगवाले, तुतारीवाले, पहारेकरी, चवरेधारी, मोर्चेलधारी, गाडीवान, चौघडावादक, मोतद्दार भालदार आणि या सर्वांना एका सूत्रात-नियंत्रणात ठेवण्यासाठी सरसावलेले चोपदार. सोहळ्याचे प्रमुख, मालक चालक या सर्व लोकांना एकत्र आणते दिंडी. अश्याच दिंड्या पेठ परिसरात आणि रस्त्यावरुन जाताना सध्या दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.