सकाळी 9 ते सायकांळी 5 या वेळेतच परवानगी : मास्क, हॅन्डग्लोव्हज आवश्यक
याच रस्त्यांवर करता येणार व्यवसाय
पुणे – शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पथारी व्यावसायाला पुन्हा मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार, सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत पथारी सुरू राहणार आहेत. मात्र, त्यासाठी महापालिकेने व्यवसायासाठी रस्ते निश्चित केले आहेत. त्या ठिकाणी केवळ अधिकृत व्यावसायिकांनाच व्यवसाय करता येणार आहे. त्यासाठी पथारी दोन पथारी व्यावसायिकांना 5 मीटर अंतर ठेऊन व्यवसाय करावा लागणार असून, विक्रेत्यांना हातमोजे आणि मास्क बंधनकारक असेल.
शिवाजी रस्ता : पुणे मनपा – डेंगळे पूल – शनिवारवाडा ते जेधे चौक
बाजीराव रोड : पुरम चौक – माडिवाले कॉलनी, शनिवार चौक, विश्रामबागवाडा -शनिवारवाडा.
हडपसर – सोलापूर रोड : मगरपट्टा चौक ते गाडीतळ, गाडीतळ ते लक्ष्मी कॉलनी चौक ते शेवाळवाडी टोलनाका ते पुणे शहर हद्दीपर्यंत तसेच गाडीतळ ते फुरसुंगी सासवड रस्त्याने पुणे शहर हद्दपर्यंत.
सातारा रस्ता : जेधे चौक – लक्ष्मीनारायण थिएटर, सिटी प्राइड, विवेकानंद पुतळा, धनकवडी फ्लायओव्हर ते कात्रज चौक, कात्रज चौक ते सातारा रस्त्याने पुणे शहर हद्दीपर्यंत. नगर रस्ता : येरवडा पर्णकुटी, गुंजन चौक, विमाननगर, वडगावशेरी, खराडी बायपास चौक ते वाघोली, तैलाची मोरी पुणे शहर हद्दपर्यंत. विमानतळ रस्ता : गुंजन चौक – गोल्फ क्लब रोड – येरवडा पोस्ट ऑफिस – नागपुर चाळ -जैलरोड पौलीस चौकी – संजय पार्क – चौक, एअरपोर्ट.
सिंहगड रस्ता : दांडेकर पूल – पानमळा – रोहन कृतिका लगत, नाकोडा नगर, राजाराम पूल, विठ्ठलवाडी फुटपाथ-संतोष हॉल, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव-धायरी उड्डाणपूल, धायरी फाटा-धायरी शेवटचा बसस्टॉप.
पौड रोड : खंडोजी बाबा चौक – स्वातंत्र्य चौक – नळ स्टॉप- कर्वेरस्ता फ्लायओव्हर- आनंदनगर- शास्त्री नगर-कोथरुड बस डेपो- चांदणी चौक.
जंगली महाराज रस्ता : संचेती चौक- झाशी राणी चौक-डेक्कन जिमखाना-संभाजी पुतळा – खंडोजी बाबा चौक.
एफ.सी. रस्ता : खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक – वैशाली हॉटेल – फर्गसन कॉलेज रस्ता- संत ज्ञानेश्वर पादुका चौक- शिवाजीनगर पोलीस स्टेशन.
गणेशखिंड रस्ता : सिमला ऑफिस चौक – म्हसोबा चौक – सेंट्रल मॉल, शासकीय तंत्रनिकेतन- विद्यापीठ चौक- राजभवन- इंदिरा गांधी झोपडपट्टी- राजीव गांधी पूल औंध- पुणे शहर हद्दपर्यंत.