केतकावळे -पुरंदर तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी यांचे तीर्थक्षेत्र असलेले श्रीक्षेत्र कोडित येथे करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गावात गुरुवारी (दि. 23) एकाच कुटुंबातील तिघांना तर इतर 1 अशा चौघांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सोमुर्डी खंडोबा माळावरील 32 वर्षीय पुरुषासह त्याची पत्नी व लहान मुलगी असे एकाच कुटुंबातील तिघे तर गावातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गावातील बाधितांची संख्या 10वर पोहोचली आहे.
दरम्यान, गावात सध्या कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये. तसेच प्रशासनाकडून गावात सर्वतोपरी उपाय योजना करण्यात येत आल्याचे पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले