पुणे – घोड्याच्या शर्यतीच्या बेकायदा बेटींग प्रकरणी टर्फ क्लबची चौकशी होणार आहे.
घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीर बेटिंग घेणाऱ्या 31 जणांना पुणे पोलिसांनी एका विशेष कारवाई दरम्यान अटक केली होती. शहरातील हडपसर, कोंढवा, वानवडी परिसरात पोलिसांनी एकाच वेळी केलेल्या कारवाई दरम्यान बेकायदेशीर बेटिंग करणारे मोठे बुकी पोलिसांच्या जाळ्यात सापडले.
पोलिसांनी याप्रकरणी सहा गुन्हे दाखल केले असून लॅपटॉप, मोबाईल, रोख रक्कम असा साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घोडयांच्या शर्यतीचे बेटिंग अधिकृत बुकिंग घेणाऱ्या टर्फ क्लबने घेणे अपेक्षित होते.
मात्र बेकायदेशीररित्या रेसकोर्सचे बेटिंग बुकी घेत होते. यामुळे टर्फ क्लबची ही बेटिंग प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.