पिंपरी -महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करुन तिच्या घराचा दरवाजा तोडून घरात घुसून मुलाला मारहाण केली. तसेच एकाने महिलेच्या सुनेचा हात पकडून विनयभंग केला. ही घटना 12 मार्च रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास चिंचवड येथील आनंद नगर परिसरात घडली.
याप्रकरणी 54 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अमर चव्हाण, भिमराव उर्फ बिरजू मस्के व अनिकेत कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अमर चव्हाण याने लोखंडी रॉडने व लाथांनी फिर्यादी महिलेला माराहण करुन खाली पाडले तर इतर आरोपींनी फिर्यादी महिलेच्या घराचा दरवाजा तोडून घरात घसून महिलेच्या मुलाला मारहाण केली व अमर चव्हाण याने फिर्यादी महिलेच्या सुनेचा हात पकडून तिचा विनयभंग केला.