नगर – तालुक्यातील शिराढोण येथील महादेव मंदिरात आल्याच्या कारणातून चौघांनी एकाला चाकूचा धाक दाखवून लोखंडी पाइपने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.21) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रविवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात परसराम अशोक वाघ, बापू रामदास वाघ, अशोक छबुराव वाघ, जगदीश रामदास वाघ (सर्व रा. शिराढोण ता. नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनील ऊर्फ सोनु राजेंद्र दरेकर (वय-27 रा. शिराढोण ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी रात्री फिर्यादी नगरकडून शिराढोणकडे येत असताना आरोपींनी फिर्यादीस शिराढोण शिवारात वाहन आडवे लावले. व तू महादेव मंदिरात येण्याचे कारण काय?, ते आमच्या शेतात आहे. तू आमच्या चुलत्यास मारहाण करतो काय.’ असे म्हणत, आरोपींनी फिर्यादीच्या मानेला चाकू लावला. लोखंडी पाइप, दांडक्यासह, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक ठाणगे करत आहे.