पिंपरी – घरासमोर थुंकू नका, असे सांगितल्याच्या कारणावरून चार जणांनी घरात घुसून एका कुटूंबास मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 6) दुपारी काळाखडक, वाकड येथे घडली.
विठ्ठल सुभाष शिंदे (वय 33), बाळकृष्ण सुभाष शिंदे (वय 45), दत्तात्रय राजाराम खंडागळे (वय 40) आणि नन्या ऊर्फ जय बाळकृष्ण शिंदे (वय 19, सर्व रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सचिन भगवान कांबळे (वय 25) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून यांनी सोमवारी (दि. 6) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास आरोपी विठ्ठल शिंदे हा फिर्यादी कांबळे यांच्या घरासमोर थुंकला. यामुळे कांबळे यांनी त्यास येथे थुंकू नको, असे सांगितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादी कांबळे आणि त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले.