कोरोनाविरुद्ध लढाईत डॉ. संतोष बारणे यांच्यावतीने रक्तदान शिबिर!

पिंपरी  – कोरोनाव्हायरस प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत सिल्व्हर ग्रुपचे संचालक व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डॉ. संतोष बारणे यांच्या पुढाकाराने भोसरी परिसरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात सुमारे १५०० रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे राज्यातील रक्तसाठा अतिशय कमी आहे. परिणामी, कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांना आवश्यक असणारे रक्तांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत रक्तदान करावे. छोटी-छोटी रक्तदान शिबिरे आयोजित केली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका संचलित यशवंतराव चव्‍हाण स्मृती रुग्णालयातील ब्लड बँकच्या सहयोगाने उद्योजक डॉ. संतोष बारणे यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला मोशी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचेही पालन करण्यात आले. रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना सॅनिटाईझर वाटप करण्यात आले. तसेच ब्लड बँकचे प्रमाणपत्रही देण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.