नवी दिल्ली : देशातीत कोरोनाच्या स्थितीने तळागाळापासून ते उच्चभ्रूपर्यंत सर्वांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यात आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला असून कोणाला बेड मिळत नाहीये तर कोणाला ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे घाबरून जाऊन लोक ज्या पद्धतीचे उपचार घेत आहेत ते पाहता देशातील आरोग्य यंत्रणेसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. कोरोनावर उपचार घेत असताना वारंवार CT Scan करणं हे जीवावर बेतू शकत. त्यामुळे वेळीच सावध होण्याचा इशारा AIIMS कडून देण्यात आला आहे.
कोरोनाचे उपचार करताना CT Scan चा गैरवापर केला जात असून त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याचं मत AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे. AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, “रेडिएशन संबंधित एक डेटाचे विश्लेषण करताना लक्षात आलं आहे की, लोक तीन-तीन दिवसांत CT Scan करत आहेत.
CT scans & biomarkers are being misused and they can be harmful as well
There is no use of a CT scan if you have mild Covid. One CT scan is equivalent to almost 300-400 chest x-rays & it increases the risk of getting cancer in young people
– Dr. Randeep Guleria, Director, AIIMS pic.twitter.com/PWTus6xE76
— PIB India (@PIB_India) May 3, 2021
आपण जर पॉझिटिव्ह असाल आणि आपल्यात कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर आपल्याला CT Scan करण्याची आवश्यकता नाही. कारण अनेक वेळा CT Scan मधून जो रिपोर्ट येतो त्यामध्ये चुका असल्याचं लक्षात आलं आहे. त्याचा परिणाम रुग्णावर होऊ शकतो.”
डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, “जर कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असेल आणि त्याला सौम्य लक्षणं दिसत असतील तर अशा रुग्णांनी CT Scan करण्याची आवश्यकता नाही. कारण एक CT Scan हा 300 एक्स रेच्या बरोबर असतो. खासकरून तरूणांनी जर वारंवार CT Scan केलं तर त्यांच्यामधअये कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे गरज नसताना CT Scan करून आपल्या शरीराची हाणी करू नये.”