कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींनी कुठल्या टेस्ट कराव्यात ?

नवी दिल्ली –  करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात पूर्णपणे पोखरून काढले आहे. प्रत्येक दिवशी लाखोंच्या संख्येने विक्रमी करोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसात देशात साडेतीन हजारांच्या आसपास रुग्णांचा करोना, ऑक्सिजनअभावी बेड न मिळाल्याने मृत्यू होत आहे. भारतातील एकूण करोना मृतांची संख्या सव्वादोन लाखांच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे करोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

यातच  करोना बाधिताची कोरोनावर मात झाल्यानंतर कुठल्या टेस्ट करणे आवश्‍यक आहे सध्या लोकांमध्ये यावरून प्रश्न निर्माण होत आहे. जर तुम्ही कोरोना मात केली असेल  तर यानंतर या व्हायरसने तुमच्या शरीरावर किती नुकसान केले आहे, हे तपासण्यासाठी तुम्हाला काही टेस्ट करणे महत्वाचे आहे. कोणत्या टेस्ट करायच्या आहे, ते पाहूया… 

१) कोरोना व्हायरसमुळे बाधितांच्या शरीरातील अनेक अंगावर परिमाण होतो त्यासाठी  अँटीबॉडी टेस्ट करणे महत्वाचे आहे. तुमच्या शरीरातील अँटीबॉडीजची स्थिती काय आहे, हे या टेस्टद्वारे माहीत होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर दोन आठवड्यांनी ही टेस्ट करावी.

२) कंम्प्लीट ब्लड काऊंट टेस्ट, शरीरातील वेगवेगळ्या पेशींची तपासणी करण्यासाठी टेस्ट केली जाते. यामुळे रुग्णाला कोरोना संसर्गाविरूद्ध त्याचे शरीर कसे प्रतिक्रिया देत आहे, याचा अंदाज येतो. कोरोनातून बरे झाल्यानंतर ही चाचणी लोकांसाठी खूप महत्वाची आहे.

३) करोनावर मात केल्यानंतर शुगर आणि कोलेस्ट्रोल टेस्ट करणे गरजेचे असते.  शुगर असलेल्या रुग्णांसाठी ही चाचणी विशेषतः महत्त्वपूर्ण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.