मुंबई – काश्मीर क्रिकेट लीगवरून आता बीसीसीआयने थेट आयसीसीलाच पत्र लिहिले आहे. ही स्पर्धा अनधिकृत असून, अशा स्पर्धा आयोजित करण्याचा अधिकार पाकिस्तान क्रिकेट मंडळाला नाही, त्यामुळे आता आयसीसीनेच यात लक्ष घालावे, अशी मागणीही बीसीसीआयने केली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जला तंबी देण्यापासून ते शाहिद आफ्रिदीवरही टीका केल्यानंतर आता बीसीसीआयने आयसीसीलाही यात सहभागी करून घेतले आहे.
ही स्पर्धा पाक मंडळाने आयोजित केल्याचे थेट समोर आले नसले तरीही यामागे त्यांचेच प्रयत्न असून, भारतावर मात करण्यासाठीच पाकव्याप्त काश्मीरमध्ये ही स्पर्धा होणार असल्याचे पहिल्या दिवसापासून सांगितले जात असून, त्याला बीसीसीआयने सातत्याने विरोध केला आहे.